डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 6, 2025 8:16 PM

printer

राष्ट्र प्रथम हेच केंद्र सरकारचं विकासाचं मॉडेल असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पुनरुच्चार

राष्ट्र प्रथम हे आमच्या सरकारचं विकासाचं मॉडेल आहे. सबका साथ सबका विकास यावर यात भर दिल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. राष्ट्रपतींचं भाषण प्रेरक, प्रभावी आणि भविष्याची दिशा देणारं होतं. देशाचा विकसित करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि देशातले युवक विकसित भारत घडवण्यासाठी झटत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात जितक्या गरीबांचं सशक्तीकरण झालं तितकं यापूर्वी कधीही झालं नव्हतं. आमचं विकासाचं मॉडेल तुष्टीकरणावर नव्हे तर संतुष्टीकरणावर आधारित असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.

 

केंद्र सरकार गरीब आणि वंचितांसह इतर घटकांसाठी केलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. देशातल्या साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्याला सरकारचं प्राधान्य आहे. कौशल्य विकास, आर्थिक सर्वसमावेशन आणि औद्योगिक विकासावर सरकारचा भर आहे, असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात मत्स्योत्पादन आणि निर्यात दुप्पट झाली, खेळण्यांची निर्यात तिप्पट वाढल्याचा उल्लेख त्यांनी केला. काँग्रेसच्या राजकारणावर आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळावर त्यांनी सडकून टीका केली. काँग्रेसनं केवळ एकाच कुटुंबाला प्राधान्य दिलं. त्यांनी संविधान निर्मात्यांच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष केलं. सरकारच्या विरोधात बोलले किंवा सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही म्हणून काँग्रेसनं अनेक कलाकारांवर निर्बंध लादल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा