डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी वारसॉ इथं दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यासाठी राजधानी वारसॉ इथं दाखल झाले. वारसॉ इथल्या लष्कराच्या विमानतळावर प्रधानमंत्री मोद यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पोलंड आणि भारतातल्या जामनगर आणि कोल्हापूर यांच्यातले ऋणानुबंध जपणाऱ्या दोन स्मृति स्थळांना प्रधानमंत्री भेट देणार आहेत. त्यानंतर वारसॉ इथंल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी होतील आणि भारतीय वंशांच्या नागरिकांशी ही ते संवाद साधणार आहेत.

पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत हा दौरा महत्त्वाचा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी पोलंडला रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं. या दौऱ्यात प्रधानमंत्री पोलंड चे  प्रधानमंत्री  डोनाल्‍ड टस्‍क आणि राष्‍ट्रपती आंद्रेज डूडा  यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. ४५ वर्षांनंतर भारताचे प्रधानमंत्री प्रथमच पोलंडला भेटीवर गेले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून  प्रधानमंत्री मोदी येत्या शुक्रवारी २३ तारखेला युक्रेनला जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा