प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. ओडिशा प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, एनएसजी, गुप्तचर विभाग आणि एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, माओवाद, एआय टूल्समुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Site Admin | November 29, 2024 1:22 PM | Odisha | PM Narendra Modi