प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय शिक्षण कर्मयोगी सप्ताहाचं नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात प्रत्येक कर्मयोगी किमान चार तास आपल्या क्षमतेशी निगडित काही नवीन शिकण्याचा कार्यक्रम पूर्ण करेल. राष्ट्रीय शिक्षण सप्ताहात वैयक्तिक नागरिक, विविध मंत्रालयातील विभागातील कर्मचारी आणि इतर संघटनांमध्ये काम करणारे कर्मचारी सहभागी होतील. डिजिटल परिसंस्थेच्या मदतीनं नागरिकांच्या हितासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार व्हावी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं सप्टेंबर २०२० मध्ये कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आलं. नागरी सेवा देणाऱ्यांसाठी क्षमता निर्मिती आणि मानव संसाधन व्यवस्थापनासाठी विकास साधण्याचा हा कार्यक्रम आहे.