लाओस इथला दोन दिवसीय दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परत येण्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात त्यांनी एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेला संबोधित केलं. हिंद-प्रशांत प्रदेशाच्या शांतता तसंच प्रगतीसाठी एक सर्वसमावेश, मुक्त, समृद्ध आणि शिस्तबद्ध वातावरण आवश्यक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत केलं. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाचा ग्लोबल साउथ देशांवर होणाऱ्या परिणामांविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली. हे युग युद्धाचं युग नसून प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही. युरेशिया आणि पश्चिम आशिया प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
Site Admin | October 11, 2024 3:09 PM | PM Narendra Modi