मॉरिशसच्या दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला. द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन असं या सन्मानाचं नाव आहे. प्रधानमंत्री मोदी यांना मिळालेला हा २१वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
भारतात पश्चिम भागात येणारी काही साखर मॉरिशसहून आयात होत होती. काळाच्या या टप्प्यावर भारत-मॉरिशस संबंधांची गोडी अजूनच वाढली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. याच कार्यक्रमात मोदी यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा यांना ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया कार्ड जारी करत असल्याची घोषणा केली. त्याखेरीज मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखूल आणि त्यांच्या पत्नी वृंदा यांनाही ओसीआय कार्ड जारी केलं.
तत्पूर्वी आज त्यांनी पॅम्पलेमॉसेस इथे मॉरिशसचे माजी राष्ट्रपती सर अनिरुद्ध जगन्नाथ आणि प्रधानमंत्री सिवुसागुर रामगुलाम यांना आदरांजली वाहिली.