महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून सुरू होणार आहे. येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत धुळे, नाशिक, अकोला, नांदेड, चंद्रपूर, चिमूर, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई इथं पंतप्रधानांच्या प्रचार सभा होणार आहेत. आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात ते आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यात प्रचार सभांना संबोधित करतील.
महाराष्ट्रातले मतदार महायुतीलाच निवडून देतील असा विश्वास त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात व्यक्त केला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील आज राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा होणार आहेत.