प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतल्या शिखर परिषदे नंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलीनस्की यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी आर्मेनिया चे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि वॅटिकन होली सी चे परराष्ट्र मंत्री कार्डिनल पियेत्रो पेरोलीन यांच्या बरोबरही चर्चा केली. त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांची विएतनामचे राष्ट्रपती टो लैम यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहयोग वाढवण्या विषयी चर्चा झाली.