दिल्लीत आज विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असून ढोंग, अराजकता आणि संकटाचा पराभव झाला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हे शक्य झालं असून त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो, असंही मोदी म्हणाले. या निवडणुकीवेळी आपण प्रत्येक दिल्लीकराच्या नावे पत्र लिहून विनंती केली होती की दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्यासाठी संधी द्यावी. या संधीसाठी आपण दिल्लीकरांचे आभार मानतो, असं प्रधानमंत्री म्हणाले. दिल्लीकरांच्या प्रेमाची परतफेड विकासरूपाने करू, असं आश्वासनही मोदी यांनी यावेळी दिलं.
Site Admin | February 8, 2025 8:13 PM | BJP | celebrate victory in Delhi | Delhi | victory
दिल्लीत विकास, व्हिजन आणि विश्वासाचा विजय झाला असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून समाधान व्यक्त
