प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कीर स्टार्मर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं ब्रिटनच्या प्रधानमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. दोन्ही देश नागरिकांची प्रगती, समृद्धी आणि वैश्विक कल्याणासाठी व्यापक धोरणात्मक भागीदारी आणि मजबूत भारत-ब्रिटन आर्थिक संबंध वृद्धींगत करण्यासाठी वचनबद्ध आहेत, असं प्रधानमंत्री मोदी यांनी या चर्चेविषयी म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेविड लॅमी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांतील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वृद्धींगत करण्याच्या वचनबद्धतेची ग्वाही उभयतांनी दिली.
Site Admin | July 6, 2024 8:32 PM | कीर स्टार्मर | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी