प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील अमरेली इथं दूरस्थ माध्यमातून भुज-नलिया रेल्वेमार्गाच्या कामाचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. सुमारे १ हजार १०० कोटी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मार्गाची लांबी १०१ किलोमीटर आहे. या प्रकल्पामुळे गुजरातमधील कच्छ भागात स्वस्त वाहतूक आणि आर्थिक चलनवलंन वाढण्यास मदत होणार असल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी आकाशवाणीला सांगितलं. या विस्तृत प्रकल्पात २४ मोठे पूल, २५४ छोटे पूल, ३ उड्डाणपूल आणि ३० भूमिगत पूल बांधण्यात आले आहेत, असं आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.
Site Admin | October 28, 2024 9:41 AM | Bhuj-Naliya rail line | Gujarat | PM Narendra Modi