डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष, उत्तम कामगिरी, सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झालं असलं तरी भारतातल्या नागरिकांनी मात्र सातत्य, राजकीय स्थैर्य आणि आर्थिक वृद्धीला प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले. नव मध्यम वर्ग देशाला पुढे नेत असून बाजाराला नवीन दिशा देत आहे, भारत एक वैशिष्ट्यपूर्ण यशोगाथा लिहित आहे आणि या सर्व सकारात्मक धोरणांचा परिणाम देशाच्या आर्थिक वृद्धीवर दिसून येत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा