प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांची भेट घेतली. आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहॅमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत-ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांनीही या भेटी बाबत आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियामध्ये स्वागत करणं ही आनंदाची आणि सन्मानाची बाब असल्याचं नेहॅमर यांनी म्हटलं आहे.