डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

क्वाड नेत्यांच्या वार्षिक परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहे. आज डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथं होणाऱ्या क्वाड नेत्यांच्या सहाव्या वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. हवामान बदल ते उदयोन्मुख तंत्रज्ञान असे अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत. कर्करोग रोखण्यासाठी, शोधण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी नाविन्यपूर्ण धोरणाची सुरुवात या परिषदेत होणार आहे.  यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. 

अमेरिकेतल्या या तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विविध उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत. उद्या ते न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तसंच अमेरिकास्थित कंपन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बेनीज, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्यासोबत क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असं प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेला रवाना होण्याआधीच्या निवेदनात म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा