दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख हमदन बिन मोहम्मद अल मकतुम यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी नवी दिल्लीत आज भेट घेतली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे हे संबंध अधिक बळकट होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आज सकाळी युवराज शेख हमदन बिन मोहम्मद मकतुम यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दोन्ही देशातली भागीदारी भारतासाठी महत्वाची असून ही भेट त्यादृष्टीने सकारात्मक होती असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हटलं आहे.
युवराज शेख हमदन बिन मोहम्मद मकतुम यांचं आज सकाळी भारतात आगमन झालं. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. संध्याकाळी युवराज मकतुम मुंबईत येतील, इथं ते अनेक उद्योजकांशी चर्चा करणार आहेत.