देशातल्या शाळा, महाविद्यालयांमधे सहकार क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम सुरू करावे. तसंच भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. देशातल्या सहकार क्षेत्राच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्राचा विकास करण्यासाठी जागतिक पातळीवरच्या सहकारी संस्थांशी सहकार्य वाढवण्यावर भर देण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. सहकारी संस्थांच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. युपीआयला रूपे आणि किसान क्रेडिट कार्डशी संलग्नित करणं आर्थिक व्यवहार सुलभ करण्यासाठी महत्वाचं असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या बैठकीला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
Site Admin | March 6, 2025 8:19 PM | Prime Minister Narendra Modi
शाळा, महाविद्यालयात सहकार आधारित अभ्यासक्रम सुरू करण्याची प्रधानमंत्र्यांची सूचना
