काँग्रेसने आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अनेकदा अपमान केला असून आपली कृत्यं काँग्रेसला आता लपवता येणार नाहीत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. आंबेडकरांबाबतच्या विधानावरुन आज संसदेत गदारोळ झाला त्या संदर्भात त्यांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रीया दिली आहे. काँग्रेस सत्तेवर असताना दलित समुदायातल्या अनेकांची हत्या झाली असा आरोप त्यांनी केला असून अनुसूचित जाती जमातींसाठी काँग्रेसने काहीही केलं नाही असंही मोदी यांनी म्हटलं आहे.
Site Admin | December 18, 2024 3:26 PM | PM Modi
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका
