डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्त्वाचा आहे – प्रधानमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ कुरुक्षेत्र इथे जाहीर सभा घेऊन केला. विकसित भारताचं स्वप्न साकार होण्यासाठी हरियाणाचा विकास महत्त्वाचा आहे, त्यादृष्टीनं सरकारनं हरियाणाला विकासाच्या प्रवाहात आणलं असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब, महिला, शेतकरी तसंच युवावर्गाला सक्षम बनवण्याचा सरकारचा संकल्प असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात गेल्या १०० दिवसांत सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. लखपती दीदी कार्यक्रमांतर्गत केवळ  १०० दिवसांत ११ लाखांहून अधिक महिला लखपती झाल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा