डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबईत नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला राहणार उपस्थित

प्रधानमंत्री मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. नवनिर्वाचित सरकारच्या शपथग्रहण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. उद्या सायंकाळी आझाद मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याच्या तयारीची महायुतीतल्या नेत्यांनी काल पाहणी केली. या सोहळ्याला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, नागपूरच्या रामनगर इथं चहाचं दुकान चालवणारे गोपाल बावनकुळे यांना शपथग्रहण समारोहात उपस्थित राहण्याचं निमंत्रण फोन द्वारे मिळालं आहे. गोपाल बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे चाहते म्हणून ओळखले जातात.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा