नागरी उड्डाणाशी संबधित आयोजित दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आज सहभागी होत आहेत. नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या या संमेलनात प्रधानमंत्री संबोधित करतील. दरम्यान, राममोहन नायडू यांनी २०३५ पर्यंत प्रतिवर्ष ३ अब्ज प्रवाशांना विमान प्रवासात सामावून घेण्यासाठी आशिया प्रशांत उड्डयन क्षेत्राच्या प्रारुप आराखड्यात धोरणात्मक गुंतवणुकीचं आवाहन केलं आहे. २०२५ पर्यंत या क्षेत्रात महिलांचा समावेश २५ टक्क्यांनी वाढवणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे.
Site Admin | September 12, 2024 11:47 AM | civil aviation | PM Narendra Modi