देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन होत असून त्यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नागरी विमान वाहतूक या विषयावर दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रिपरिषदेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या परिषदेत दिल्ली ठराव जाहीर करण्यात आला. त्याचा सर्व सदस्य देशांनी स्वीकार केला.
नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. ते या परिषदेचे अध्यक्ष आहेत. २०३५ पर्यंत साडेतीन अब्ज वार्षिक प्रवाशांसाठी आशिया- पॅसिफिक क्षेत्रात विमान वाहतूकसाठी पायाभूत सुविधांमधे गुंतवणूकीचं आवाहन त्यांनी केलं. २०२५ पर्यंत या क्षेत्रातल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी २५ टक्के कर्मचारी महिला असतील असं भारताचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले.