अमरावतीमधून विमानसेवा सुरु झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमरावती विमानतळ आणि उडान अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेअंतर्गत अमरावती – मुंबई प्रवासी विमानसेवेचा काल प्रारंभ झाला. या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की, या विमानतळामुळे या भागात अर्थव्यवस्थेला आणि दळणवळणाला चालना मिळेल.