प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मंदिर शतकानुशतके बलिदान, तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलं गेलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी याला आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा महान वारसा, असंही म्हटलं आहे.
विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे दिव्य आणि भव्य राम मंदिर प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून तीन दिवसांचा विशेष कार्यक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा झाली होती, परंतु तिथीनुसार आजपासून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामलल्लांचा अभिषेक होणार आहे.