ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक उमेश उपाध्याय यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, उपाध्याय यांच्या निधनानं पत्रकारितेच्या जगाचं न भरून येणारं नुकसान झालं असल्याचं समाजमाध्यमांवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
उपाध्याय 64 वर्षांचे होते. दक्षिण दिल्लीतल्या वसंत कुंज भागात त्यांच्या घराच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहाणी करताना चौथ्या मजल्यावरुन उपाध्याय पडले त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.