डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कॅनडामध्ये फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्र्यांकडून निषेध

 

कॅनडामध्ये काल ओंटारियोमधल्या ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिरात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हल्ल्याद्वारे कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणे हा भ्याडपणा आहे.

 

अशा घटनांमुळे भारताचा संकल्प अजिबात ढळणार नाही. असं त्यांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या संदेशात म्हटल आहे. कॅनडा सरकारने देशात कायदा सुव्यवस्था राहील याची काळजी घ्यावी आणि या हल्ल्याबाबत योग्य कारवाई करावी असही प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटल आहे. 

 

दरम्यान, कॅनडामधल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी भारताची अपेक्षा आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कॅनडा सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

 

व्हँकुव्हर आणि सरे इथंही २ आणि ३ नोव्हेंबरला अशाच प्रकारच्या सभांमध्ये हिंसाचार झाला होता.दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ कॅनडातल्या भारतीय समुदायाने काल निदर्शनं केली. 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा