डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवण्यासाठी भारतानं डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

देशाच्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पुरवण्यासाठी डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर भारतात सुरू असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषदेच्या उद्घाटनसत्रात ते बोलत होते. आशिया प्रशांत क्षेत्रात पहिल्यांदाच ही परिषद होत आहे. ८ व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.

दूरसंचार आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रांचा विचार करता भारतात सध्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. भारतात १२० कोटी मोबाइल वापरकर्ते, ९५ कोटी इंटरनेट वापरणारे आणि जगातल्या डिजिटल व्यवहारांमधले ४० टक्के व्यवहार भारतात होतात असं ते आज म्हणाले. स्वस्तातली उपकरणं, कानाकोपऱ्यात संपर्क यंत्रणा, परवडणाऱ्या दरात डेटा आणि डिजिटल होण्याला प्राधान्य या ४ स्तंभांवर भारताचं डिजिटल धोरण अवलंबून असल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरातल्या १९० देशातले ३ हजारांहून अधिक तज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा