डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू-काश्मीर मध्ये युवा वर्गाच्या राजकारणातल्या सहभागामुळे विकासाचं नवं युगं अवतरल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या काही वर्षांत जम्मू- काश्मीर मध्ये युवकांच्या राजकारणातल्या सहभागामुळे विकासाचं नवं युगं अवतरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज जम्मू- काश्मीरमध्ये डोडा इथं प्रचारसभेला संबोधित केलं.  स्वातंत्र्यानंतर जम्मू- काश्मीर हा प्रदेशावर जगाचं लक्ष असल्याचं ते म्हणाले. यापूर्वी ज्या पक्षांवर जम्मू- काश्मीरच्या नागरिकांनी विश्वास ठेवला, त्या पक्षांनी फक्त परिवारवादाला महत्व दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे जम्मू- काश्मीरमधला युवा वर्ग हा आतंकवादामुळे पिचला असल्याचं त्यांनी म्हटलं. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज  हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी कुरुक्षेत्र इथून भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. ते आज दुपारी कुरुक्षेत्रच्या थीम पार्कमध्ये प्रचारसभेला संबोधित करतील. हरियाणामध्ये प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच प्रचारसभा आहे. हरियाणा विधानसभेसाठी ५ ऑक्टोबरला मतदान होणार असून ८ ऑक्टोबरला मतमोजणी  होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा