देशाच्या संरक्षण क्षेत्र तसंच अवकाश मोहिमांना सहाय्य करण्याच्या उद्देशानं काम करणाऱ्या दिगंतर या स्कॉट अभियानातील स्टार्टअपच्या यशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. अंतराळास्थितीविषयी जागरुकता वृद्धीच्या दिशेने भारतीय अंतराळ उद्योगाकडून मिळालेले हे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत म्हटलं आहे.
दुसऱ्या एका संदेशामध्ये प्रधानमंत्र्यांनी पीएम इंटर्नशिप योजनेच्या उत्साहवर्धक परिणामांविषयी समाधान व्यक्त केलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारल्यामुळे देश विश्वनेता म्हणून प्रस्थापित होत असल्याबद्दलही आनंद त्यांनी या संदेशात व्यक्त केला आहे.