राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज साजऱ्या होत असलेल्या लोहडी तसंच उद्या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत, पोंगल, माघ बिहू या सणानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिक असणारे हे सण, सर्वांच्या जीवनात उत्साह आणि आनंद घेऊन येवोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
लोहडी आणि माघ बिहू निमित्त प्रज्वलित केला जाणाऱ्या अग्नीच्या पवित्र ज्वाला सगळ्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतील आणि संक्रांतीनिमित्त आकाशात भिरभिरणारे पतंग सर्वांची मनं आनंदानं भरून टाकतील, अशी कामना उपराष्ट्रपतींनी केली आहे.
हे सण देशबांधवांना आनंद आणि समृद्धी देतील अशा शब्दात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Site Admin | January 13, 2025 2:23 PM | उपराष्ट्रपती | मकर संक्रांत | राष्ट्रपती