नव्या काळाच्या गरजेनुसार शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जात असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज हरियाणातल्या हिसारमधल्या गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. नव्या शैक्षणिक धोरणानुसार मिळणारं शिक्षण मुलांमध्ये कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल, असंही त्या म्हणाल्या.
Site Admin | March 10, 2025 7:50 PM | President Draupadi Murmu
शिक्षण व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु-राष्ट्रपती
