एखाद्या देशाचा किंवा समाजाचा विकास त्या देशाच्या नागरिकांनी दिव्यांग जनांविषयी बाळगलेल्या संवेदनशीलतेच्या आधारेच गणला जाऊ शकतो, असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली इथं मांडलं. त्या पंडित दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय दिव्यांग संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. समावेशी वृत्ती हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असल्याचं मुर्मू यावेळी म्हणाल्या.
मुर्मू यांनी या संस्थेतल्या दिव्यांग मुलांशी संवाद साधला. त्यांनी या संस्थेतल्या नविकृत कृत्रिम अवयव केंद्रालाही भेट दिली. दिव्यांग जनांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या कर्मचारी वर्गाचं मुर्मू यांनी कौतुक केलं.