डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच मायदेशी आगमन

फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्त्वाच्या मुद्यांबाबत सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तिथल्या भारतीय समुदायाशी जोडणं, हाही या भेटीमागचा उद्देश होता.

 

न्यूझीलंडमध्ये, दोन्ही देशांमधल्या व्यापार सुलभीकरणाकरता द्विपक्षीय सीमाशुल्क सहकार्य करारावर राष्ट्रपतींच्या या दौऱ्यामध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. संयुक्त संशोधन आणि विकास संधींचा मार्ग खुला करण्यासाठी न्यूझीलंडनं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता दिली. पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात देवाणघेवाण करण्यासाठी जामनगर इथल्या पारंपरिक औषधांच्या जागतिक केंद्राला  दोन्ही देशांनी मान्यता दिली.

 

तिमोर लेस्तेमध्ये, प्रसार भारती आणि तिमोरचे सार्वजनिक प्रसारक, असलेल्या रेडिओ टेलिव्हिसॉन तिमोर लेस्ते, यांच्यात सहकार्य करार झाला. याबरोबरच अधिकृत आणि राजनैतिक पारपत्र धारकांसाठी व्हिसा माफी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यावरही सामंजस्य करार झाले.

 

फिजीमध्ये, १०० खाटांच्या सुपर स्पेशालिटी हृदयरोग रुग्णालयासाठी प्रकल्पाकरता जागा देण्याबाबतच्या कागदपत्रांची औपचारिक देवाणघेवाण झाली.  

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा