डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे पंचायतींच्या समर्पणाचं आणि प्रयत्नांचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं वितरण आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

या वर्षी विविध श्रेणींमध्ये एकंदर ४५ पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली. ओडिशा आणि त्रिपुरा या राज्यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी सात पुरस्कार मिळाले. तर महाराष्ट्राला सहा पुरस्कार मिळाले. यामध्ये पंचायत क्षमता निर्माण श्रेणीत पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी-यशदाला तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

 

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीनं नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार, तसंच ग्राम उर्जा स्वराज विशेष ग्राम पंचायत अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे.

 

गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गटाला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

 

नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत स्वच्छ आणि हरित ग्राम पंचायत हा तृतीय क्रमांकाचा, तर भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा