राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी सियाचिन इथल्या लष्करी तळाची पहाणी केली. सियाचिन ग्लेशियर इथं तैनात असलेले जवान आणि अधिकाऱ्यांशी राष्ट्रपतींनी संवाद साधला. सियाचिन इथल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं. तसंच या सैनिकांच्या कुटुंबांचे ही राष्ट्रपतींनी आभार मानले. सियाचिन लष्करी तळावर असलेल्या युद्ध स्मारकावर राष्ट्रपतींनी पुष्पांजली अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली.
माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद यांच्यानंतर सियाचिनला जाणाऱ्या द्रौपदी मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आहेत.