राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी राष्ट्रपतींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपतींनी एकता नगर इथं जंगल सफारीचा आनंद घेतला. एकता कौशल्य विकास केंद्राला राष्ट्रपती भेट देणार असून तिथल्या प्रशिक्षणार्थींशी त्या संवाद साधणार आहेत. त्यानंतर अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय डिझाईन संस्थेच्या ४४ व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहतील.
Site Admin | February 27, 2025 1:34 PM | President Droupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्टॅच्यू ऑफ युनिटीला दिली भेट
