गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या अनेक भागात एकत्रित येऊन साजरा केला जातो आणि हे सामाजिक ऊर्जेचे एक चांगले उदाहरण आहे. असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे की, गणेशोत्सवाचा हा सण बुद्धी, समृद्धी आणि उज्वल भविष्य देणारा आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गणपती बाप्पा मोरया म्हणत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Site Admin | September 7, 2024 6:41 PM | Ganesh Chaturthi 2024 | Ganeshotsav 2024