राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आज सकाळी वेलिंग्टन इथं पोहोचल्या. न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांच्या उपस्थितीत त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी वेलिंग्टन रेल्वे स्थानका समोरच्या उद्यानातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
राष्ट्रपती मुर्मू यांनी आज वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन आणि इतर नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सीमाशुल्क सहकार्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी झाली. त्यानंतर राष्ट्रपती न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीला उपस्थित राहिल्या.