डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर असून त्यांना आज ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलयम काटोनिवेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ द ऑनर’ सुद्धा देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत-फीजी संबध दृढ करण्यासंदर्भात फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासमवेत चर्चा केली. फिजीची राजधानी सुवा इथं आज सकाळी त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं. 

 

Image

 

फिजीत गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेल्या सौर प्रकल्पाची राष्ट्रपतींनी पाहणी केली. फिजीच्या संसदेला त्यांनी काल संबोधित केलं, यावेळी फीजी आणि भारत त्यांच्यामधल्या ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा त्यांनी उल्लेख केला. फिजीच्या दौऱ्यानंतर राष्ट्रपती मुर्मू ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान न्यूझीलंडला जाणार आहेत. तर १० ऑगस्टला त्या तिमोर लेस्टे देशाला भेट देणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा