देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.
Site Admin | October 9, 2024 8:18 PM | Ayurveda | President Droupadi Murmu
आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
