डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स च्या १६व्या परिषदेचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत एशियन ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन्स च्या १६व्या परिषदेचं उद्घाटन केलं. भारताच्या सीएजी यांची देशाच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. भारतीय संविधानानं कॅग कार्यालयाला व्यापक अधिकार आणि संपूर्ण स्वायत्तता प्रदान केली असल्याचं त्यांंनी सांगितलं. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी लेखापरीक्षण संस्थांच्या भूमिकेवर चर्चा होणार आहे. या संमेलनात ४२ देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे २०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा