डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरात दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून पाच दिवस बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या आज बिहारमध्ये पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. उद्या, मध्य प्रदेशात छत्तरपूर इथं बागेश्वर जनसेवा समितीच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहतील. त्यानंतर त्या गुजरात इथे स्टॅच्यू ऑफ यूनिटीला भेट देऊन आदरांजली अर्पण करतील आणि केवडिया इथं नर्मदा आरतीला उपस्थित राहतील. येत्या २७ तारखेला केवडिया इथल्या एकता कौशल्य विकास केंद्राला त्या भेट देतील आणि अहमदाबादमधल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या ४४व्या दीक्षांत सोहळ्यालाही त्या उपस्थित राहणार आहेत. यानंतर भूज इथल्या स्मृतिवन भूकंप स्मारक आणि जागतिक वारसा स्थळ असलेल्या धोलावीराला त्या भेट देणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा