युनानी उपचारपद्धतीतलं शिक्षण, संशोधन, आरोग्यसेवा आणि औषधांचं उत्पादन या क्षेत्रांमध्ये भारतानं जागतिक पातळीवर मोठी आघाडी घेतली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. युनानी दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली इथं दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. युनानी आणि इतर भारतीय उपचारपद्धतींचा विकास करायला सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
Site Admin | February 11, 2025 8:21 PM | President Droupadi Murmu
भारताची जागतिक पातळीवर मोठी आघाडी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
