भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकानं राष्ट्र प्रथम हा दृष्टिकोन स्वीकारणं गरजेचं आहे, यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भर दिला. त्या आज हैद्राबाद इथं लोक मंथन कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीत बोलत होत्या. राष्ट्रपतींनी यावेळी आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचं औपचारिक उदघाटन केलं. देशात विविधता असली तरीही एकता अबाधित राखण्यासाठी भारताची संस्कृती, भाषा, परंपरा आणि ज्ञान यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. गुलामीची मानसिकता बदलली तर सामाजिक असमानताही दूर होईल, असं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमाला तेलंगाण्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे देखील उपस्थित होते.