राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आफ्रिकन राष्ट्रातील आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी आज मलावीतील सांस्कृतिक स्थळांना भेट देणार आहेत. काल राष्ट्रपतींनी त्यांचे समपदस्थ लाजरस चकवेरा यांच्याशी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली. भारत आणि मलावीदरम्यान क्रीडा, युवा, औषधनिर्माण, कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्यासाठी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. भारतानं मलावीला एक हजार मेट्रिक टन तांदूळ आणि कर्करोगावरील उपचार सामग्री तसंच अवयव प्रत्यारोपण केंद्र उभारणीसह इतर वैद्यकीय मदत देण्यास मान्यता दिली. भारताच्या राष्ट्रपतींनी अलगेरिया, मोरिटानिया आणि मालावी या आफ्रिकन देशांना दिलेली ही पहिलीच भेट आहे. अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांनं दिली.
Site Admin | October 19, 2024 10:42 AM | President Draupadi Murmu