राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून चार दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर आहेत. त्या उद्या पुरी इथं भगवान जगन्नाथ, भगवान बालभद्र, सुभद्रा देवी आणि भगवान सुदर्शन यांच्या रथ यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या आज संध्याकाळी भुवनेश्वर इथं उत्कलमणी गोपालबंधू दास यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
सोमवारी त्या ऐतिहासिक उदयगिरी आणि खंडगिरी गुंफांना भेट देऊन नंतर बिभूती कानूंगो महाविद्यालय आणि उत्कल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मंगळवारी दिल्लीला परतण्यापूर्वी राष्ट्रपती भुवनेश्वर जवळ ब्रम्हकुमारी केंद्राला भेट देणार असून त्यानंतर त्या राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या १३ व्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहणार आहेत.