राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज युनानी दिना निमित्त दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कऱणार आहेत. प्रसिद्ध युनानी चिकित्सक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त आज ११ फेब्रुवारी हा दिवस युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आयुष मंत्रालयाअंतर्गत सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसीनच्या वतीनं, युनानी उपचारपद्धतीत नवोन्मेषासंदर्भातील, इनोव्हेशन्स इन युनानी मेडिसीन फॉर इंटिग्रेटिव्ह हेल्थ सोल्युशन्स- अ वे फॉरवर्ड या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे.