डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र विधान परिषदेनं जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांचे गौरवोद्गार

विधान परिषदेनं विविध महत्वपूर्ण निर्णय, कायदे करण्याबरोबरच लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचं काम केलं आहे; एका जबाबदार वरिष्ठ सभागृहाची भूमिका यशस्वीपणे बजावत, देशाच्या संसदीय प्रणालीत महाराष्ट्र विधीमंडळाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी काढले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करताना त्या काल मुंबईत बोलत होत्या. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व; या ग्रंथाचं प्रकाशनही यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. तसंच ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘ उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचं वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र विधान परिषदेचं राज्याच्या विकास कार्यात मोठं योगदान असल्याचं यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून विधिमंडळाच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख केला.
तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देऊन डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा