राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सकाळी अल्जीरिया, मॉरिटानिया आणि मलावी या ३ राष्ट्रांच्या भेटीवर रवाना झाल्या. या आफ्रिकी देशांना भेट देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. त्या आज रात्री अल्जीरियात दाखल होतील. अल्जीरिया भेटीत त्या अनेक द्विपक्षीय बैठका घेतील आणि सोबतच भारतीय वंशाच्या लोकांची भेट घेतील. त्या अल्जीरियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतील तसंच तेथील सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांनाही त्या भेट देतील. १६ तारखेला त्या मॉरिटानियाला तर १७ तारखेला त्या मलावी या देशाला भेट देतील.
Site Admin | October 13, 2024 1:50 PM | America | Draupadi Murmu | US