राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ ते १० ऑगस्टदरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फिजी आणि टिमोर लेस्ट या दोन देशांना भारताच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभाग सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पूर्वेकडे पहा या धोरणामुळे नैऋत्य भारत आणि प्रशांत क्षेत्राकडे भारताचं विशेष लक्ष असल्याचं आणि हे तिन्ही देश या धोरणांतर्गत येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | August 2, 2024 8:10 PM | President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ५ ते १० ऑगस्टदरम्यान फिजी, न्यूझीलंड आणि टिमोर लेस्ट या तीन देशांच्या दौऱ्यावर
