डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून आज दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला रवाना

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अल्जिरियाचा तीन दिवसांचा दौरा आटोपून आज दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला रवाना झाल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी अल्जेरियाचे उच्चपदस्थ आणि शिष्टमंडळांसोबत विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि भारत-अल्जेरिया संबंधांना बळकटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचारविनिमय केला.

 

मॉरिटानियाच्या एका दिवसाच्या दौऱ्यात त्या मॉरिटानियाचे प्रधानमंत्री मोहम्मद ओल्ड गजौआनी आणि इतर नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकांमध्ये सहाभागी होतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू मॉरिटानियातल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. राष्ट्रपतींचा अल्जेरिया दौरा ऐतिहासिक ठरला असून या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल. तसंच ब्रिक्समध्ये अल्जेरियाच्या सदस्यत्वाच्या मुद्द्याला भारत पाठिंबा देईल, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव अरुणकुमार चॅटर्जी यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा